भायगाव – बिलोणी रस्त्यावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

वैजापूर,३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील भायगांव – बिलोणी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीचे वय 40 ते 45 वर्ष असून अंगात आकाशी रंगाचा फुलशर्ट व खाकी रंगाची पॅन्ट आहे. त्याच्या हातावर के.सी. असे इंग्रजी अक्षरे गोंदलेली आहे. 

भायगाव – बिलोणी रस्त्यावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार आर.आर. जाधव, गोपनीय शाखेचे संजय घुगे, विशाल पैठणकर, अविनाश भास्कर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली.मात्र त्याची ओळख पटणारी कोणतेही वस्तू सापडून आली नाही. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची माहिती असल्यास शिऊर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.