बीड जिल्ह्यात उभी पीके सुकली :आमदार धनंजय मुंडे यांनी ​केली ​ पिकाची पाहणी

May be an image of 8 people, people standing and outdoors

बीड,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- ​ बीड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने उभी पीके सुकून चालली आहेत.​परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज मुरकूटवाडी ता.अंबाजोगाई येथील शेतकरी सुनील मुरकुटे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्यापुढे संकटांचा डोंगर उभा असून, अशीच बिकट परिस्थिती जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आहे. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी सोयाबीनसह विविध पिकांचे पंचनामे करून किमान 25% अग्रीम मदत देण्याची कार्यवाही शासनाने तातडीने करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.