वैजापूर शहर व परिसरात श्री.गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

वैजापूर,३१ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर शहर व ग्रामीण भागात सकाळ पासूनच उत्साही वातावरण असून शहरातील विविध गणेश मंडळ “श्री” ची स्थापना करीत असल्याचे चित्र दिसून आले. 

शहर व ग्रामीण वैजापूरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिस  स्टेशन मधून सत्तर गणेश मंडळांनी “श्री ”  स्थापन करण्याची अधिकृत परवानगी घेतली अशी माहिती गोपनीय शाखेचे संजय घुगे यांनी गणेश महासंघ सचिव धोंडिरामसिंह राजपूत यांना दिली. रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्याचे काम चालू होते. दुपारी येथील मानाचा गणपती मानल्या जाणाऱ्या नगर पालिकेच्या श्री गणेश मूर्तीची स्थापना व आरती माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी गणेश महासंघाचे सचिव धोंडिरामसिंह राजपूत, अभियंता प्रकाश पाटील, भांडरपाल वाल्मिक शेटे, शंकर जोरे, प्रमोद मुळे, अरुण कुलकर्णी, विष्णू आलूले, याची उपस्थिती होती,बऱ्याच गणेश मंडळांनी आपल्या मंडळाची गणेश मूर्ती वाजत गाजत नेऊन श्री ,स्थापना केली.