कोरोनाचा हाहाकार; २४ तासात ९०४ रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत भारताने 6,64,949 चाचण्या करत नवा विक्रम नोंदवला

नवी दिल्ली,
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. तसेच दररोज कोरोनाबळींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात तब्बल ९०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, आज सलग आठव्या दिवशी ५० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाच्या तब्बल ५६ हजार २८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता १९ लाख ६४ हजार ५३७ इतकी झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशभरात सध्या ५ लाख ९५ हजार ५०१ सक्रीय रुग्ण आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत १३ लाख २८ हजार ३३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४० हजार ६९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

“टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट” या रणनीतीवर लक्ष केंद्रित करत भारताने सलग तिसर्‍या दिवशी 6 लाखांहून अधिक कोविड -19 नमुन्यांची चाचणी केली आहे. दररोज चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्याच्या भारताच्या संकल्पामुळे गेल्या 24 तासांत 6,64,949 चाचण्या करत दररोज 10 लाख चाचण्या करण्याच्या दिशेने भारताने यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे.

आतापर्यन्त करण्यात आलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 2,21,49,351 वर पोहचली आहे. प्रति दहा लाख चाचण्यांच्या संख्येत 16050 इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. आक्रमकतेने चाचण्या केल्यामुळे बाधित रुग्ण ओळखण्यात मदत झाली, त्याच्या संपर्कात आलेल्यांची शोध घेण्यात आला आणि त्यांचे अलगीकरण आणि योग्य उपचार करता आले.

‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या रणनीतीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे कोविड-19 च्या निदान प्रयोगशाळांचा निरंतर विस्तार करण्यात येत आहे. आज देशात 1370 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 921सरकारी तर 449 खाजगी प्रयोगशाळा आहेत.

• रियल टाईम RT PCR आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 698 (सरकारी 422 + खाजगी 276)

• TrueNat आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा: 563 (सरकारी 467 + खाजगी 96)

• CBNAAT आधारित चाचण्यांच्या प्रयोगशाळा : 109 (सरकारी 32 + खाजगी 77)

बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 13.2 लाखांहून अधिक

गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 46,121 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर कोविड-19 च्या बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 13,28,336 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाल्याने, बरे झालेले रूग्ण आणि सक्रिय कोविड-19 च्या रुग्णांमधील प्रकरणांमधील अंतर 7,32,835 वर पोहोचले आहे.

रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याच्या दर 67.62 टक्क्यांची वाढ होत अजून एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.देशातील वास्तविक रुग्णसंख्या ही सक्रीय रुग्ण संख्या आहे (5,95,501) जी कोविड बाधित रुग्ण संख्येच्या 30.31 % आहे. ते एकतर रुग्णालयात उपचार घेत आहेत किंवा मग गृह अलगीकरणात आहेत.

24 जुलै 2020 रोजी असलेल्या 34.17 % सक्रीय रुग्णांच्या टक्केवारीत लक्षणीय घट होऊन आज ती 30.31 % झाली आहे.

‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टीकोना अंतर्गत, कोविड-19 प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संसाधने एकत्रितपणे केंद्रीय-नेतृत्त्वाच्या धोरणानुसार एकत्रित कार्य करीत आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या “टेस्ट ट्रॅक ट्रीट” नीतीची अंमलबजावणीमुळे, रुग्णालयाची पायाभूत सुविधा व चाचणी सुविधांमध्ये वृद्धी झाली असून केंद्राच्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यावर भर देण्यात आल्याने कोविड-19 च्या रुग्णांच्या मृत्यू दरात घट सुनिश्चित झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे, जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर कमी असून यात निरंतर घट होत आहे. आज चा मृत्यू दर 2.07% आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *