श्रीगणेश महासंघ शाखा वैजापूर कार्यकारिणीची फेरनिवड ; अध्यक्षपदी गायकवाड तर सचिवपदी ठाकूर

काशीनाथ गायकवाड

वैजापूर,३१ऑगस्ट  /प्रतिनिधी :- गत तीन वर्षांपासून कोरोनामुळे श्री. गणेश उत्सव मोठ्या उत्साहात होऊ शकला नाही. यावर्षी अत्यंत  जोम व उत्साह गणेश भक्तात आहे याचे भान ठेवत अत्यंत कमी वेळ असल्याने गेल्या तीन वर्षांपूर्वी गठीत झालेली येथील गणेश महासंघाच्या कार्यकारिणीचीच फेरनिवड माजी नगराध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. अध्यक्षपदी काशीनाथ गायकवाड तर सचिवपदी धोंडिरामसिंह राजपूत, जफर ए.खान व घनश्याम वाणी यांची फेरनिवड झाली.

धोंडिरामसिंह राजपूत

याशिवाय प्रमुख मार्गदर्शक आ. रमेश पाटील बोरणारे,माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, कार्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष साबेरखान, राजुसिंह राजपूत, दशरथ बनकर तर सल्लागारपदी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी ,एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष संजय निकम, सचिन वाणी, मजीद कुरेशी, कोषाध्यक्ष प्रशांत सदाफळ, प्रकाशशेठ बोथरा, प्रशांत त्रिभुवन, राजेंद्र साळुंके, प्रकाश चव्हाण, सहसचिव ,भानुदास धामणे, विजय गायकवाड, बाबा साहेब धुमाळ, मकरंद कुलकर्णी, धीरज राजपूत, प्रशांत कंगले, काझी हाफीजोद्दीन, मोबिन खान, दीपक बरकसे, अमोल राजपूत, मन्सूरअली, डॉ. कसबे, दीपक थोरे काकासाहेब लव्हाळे याशिवाय शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी संघाचे पदसिद्ध सदस्य असतील. गणेश खैरे, दिनेश राजपूत, पारस घाटे, राजेश गायकवाड, बजरंग मगर, ज्ञानेश्वर टेके हे संघटक म्हणून आहेत सर्व गणेश भक्तांनी शांततेत उत्सव साजरा करून गणेश महासंघाला सहकार्य करावे असे आवाहन सचिव धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले आहे.