सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई ,२९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सिक्कीमचे पर्यटनमंत्री बी. एस. पंत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

सिक्कीम राज्यातील अनेक रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत असतात. या रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी सिक्कीम सरकारच्या वतीने नवी मुंबईत   ‘सुस्वास्थ्य भवन’ बांधण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.