राज्याचे मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. राठोड यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मंत्री राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असे ट्विट राठोड यांनी केले आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास त्यांनी सांगितले आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.