“आमदार आपल्या गावी” वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील गावांना आ.बोरणारे यांची भेट ग्रामस्थांकडून जाणून घेतल्या समस्या

वैजापूर,२७ऑगस्ट  /प्रतिनिधी :-वैजापुर- गंगापूर विधानसभा मतदारसंघातील शरिफपुरवाडी, शिरसगाव व शिंदेवाडी फाटा या गावांना आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी शनिवारी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या.

गावातील मतदारसंघात विविध विकास कामे, महावितरण, शेतीविषयक, पाणी, विद्युत रोहित्र जळणे, बँकविषयी, दळणवळणाच्या रस्त्याविषयी अशा गावातील अनेक समस्या विषयी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी आमदार बोरणारे यांनी संवाद  साधत सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या दौऱ्यात असताना आ. बोरणारे यांनी शरिफपूररवाडी गावातील शाळेत अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत अभ्यासक्रम, खेळाबद्दल व वेगवेगळी प्रकारे असलेली आवडीबद्दल विचारणा केली तसेच शाळा परिसराची पाहणी केली.

बोरणारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पाटील चव्हाण, नगरसेवक विजय पानकडे, माजी उपसभापती महेंद्र पाटील गंडे, पंचायत समिती सदस्य बद्रीभाऊ चव्हाण, उपविभागप्रमुख विजय काकडे, शेषराव काका साळुंके, नानासाहेब पाटील धोत्रे, बाळासाहेब टेमकर, सरपंच राहूल काळवणे, जगदीश साळुंके, बद्रिभाऊ भुसारे, रवी दंडे, बाबासाहेब कान्हे, साईनाथ चव्हाण, तात्याराव शिरसाठ, रामसिंग राजपूत, अक्षय शिरसाठ, योगेश बोरुडे यांच्यासह  पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.