मान्सून १५ दिवस आधीच सुरू करणार परतीचा प्रवास

मुंबई : राज्यात मान्सून १५ दिवस आधीच मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली आहे. सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. राज्यात यंदा झालेल्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत तर अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढावल्याचे चित्र आहे.

एकंदरीत मान्सूनचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरपासून सुरू होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. पण यंदा मान्सून लवकर जाणार आहे. बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम पाऊस-पाण्यावर होत असतो. त्यामुळे आता पावसाचे स्वरुपही बदलले आहे.