महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये ३.४ इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे ३.२८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.

कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री २:२१ च्या सुमारास ३.९ तीव्रतेचा भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या १० किलोमीटर खोलवर होता. तर, काश्मीरमध्ये पहाटे ३:२८ वाजण्याचा सुमारास जाणवलेले भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होता. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मध्यरात्री २:५५ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी रिस्टर स्केल होती. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ८० किमी खोलीवर होता.