माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

लातूर:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी अल्प आजाराने येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. जुलैमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, पण यातून ते बाहेर आले होते.

लातूरमधील कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते असलेले निलंगेकर हे जून 1985 ते मार्च 1986 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. 1985 मध्ये औषधशास्त्रातील पदव्युत्तर परीक्षेच्या निकालात अनियमितता झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कठोर ताशेरे ओढले होते. त्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी आपली मुलगी व तिच्या मित्राला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर होता.
 
 
निलंगेकर यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना लगेच पुण्यातील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोरोनावर त्यांनी मात केली असली, तरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांचे मूत्रिंपडही अपयशी ठरले होते. यावर उपचार सुरू असताना, आज सकाळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते अतिशय निकटचे सहकारी होते. वसंतदादा मुख्यमंत्री असताना, कॉंगे्रसच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी प्रभा राव यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती आपल्या अंधारात ठेवून करण्यात आली, असा आरोप करून वसंतदादा यांनी यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.
1991 मध्ये त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर ते एक वर्ष होते. त्यानंतर 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये ते महसूल मंत्री होते.

परिचय

नाव : डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील-निलंगेकर, स्वातंत्र्य सैनिक व माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

जन्म दिनांक : ०९ फेब्रुवारी १९३१

शैक्षणिक पात्रता : एम.ए. (राज्यशास्त्र), पीएचडी, एलएलबी (नागपूर विद्यापीठ)

कायमस्वरूपी पत्ता : अशोक बंगला, मु. पो. निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर ४१३५२१, महाराष्ट्र, दूरध्वनी : ०२३८४-२४२०४१

रहिवासी : २०१, गोदावरी, वरळी सागर को.ऑप. हाऊसिंग सोसायटी, पोचखानवाला मार्ग, वरळी सीफेस (न), मुंबई ४०००२५, दूरध्वनी – ०२२ २४९७३२०४, मोबाइल ९४२२०७१७००

ग्रंथ संपदा : १. राजकीय चळवळी, संघटन आणि परिवर्तन, Political Awareness, mobilization and change in Marathwada

जीवनचरित्र व कार्य यावर प्रसिद्ध झालेले ग्रंथ व गौरवग्रंथ : १. तेरणाकाठ (फेब्रुवारी १९९३), २. गौरवग्रंथ ‘निष्ठावंत नेतृत्व’ (फेब्रुवारी २०१४), ३. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर ‘प्रेरणादायी जीवनाचा प्रवास’ (फेब्रुवारी २०१४)

विचार व कार्यावर झालेले संशोधनपर लिखाण : १. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे राजकीय नेतृत्व : एक अभ्यास, संशोधक – नाबदे महादेव वैजनाथराव (स्वारातीम विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी बहाल २०१४)

२. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सामाजिक आणि ऐतिहासिक कार्य

संशोधक – बब्रुवानी मोरे

(स्वा.रा.ती.म. विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी बहाल २०१४)

स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व कार्ये : १. हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग (१९४७-४८)

२. सेवा दल संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग (१९४५-१९४८)

३. आर्य सभा, महाराष्ट्र परिषद आणि सेवादल या संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग.

विविध संघटनेत सक्रिय सहभाग : आर्य समाज चळवळीत सक्रिय सहभाग

शिक्षण संस्थेची स्थापना : महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगा (स्थापना १९६८) संस्थापक अध्यक्ष

शैक्षणिक चळवळीतील योगदान (महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत एकूण २६ शाखा) : महाराष्ट्र विद्यालय, निलंगा (कला, वाणिज्य, विज्ञान, व्होकेशनल, बीसीए)

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, निलंगा (कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल)

महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय (B. Engineering), निलंगा (विना अनुदानित)

महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, निलंगा

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेडोळ

महाराष्ट्र विद्यालय, जेवरी

महाराष्ट्र विद्यालय, चिंचोली (स.)

महाराष्ट्र विद्यालय, मुदगड (ए.)

महाराष्ट्र विद्यालय, हालसी (तु.)

महाराष्ट्र विद्यालय, हालसी (हा.)

महाराष्ट्र विद्यालय, लांबोटा

महाराष्ट्र विद्यालय, उमरगा (हा.)

महाराष्ट्र विद्यालय, लिंबाळा

महाराष्ट्र विद्यालय, शेळगी

महाराष्ट्र विद्यालय, निटूर

महाराष्ट्र विद्यालय, नेलवाड

महाराष्ट्र विद्यालय, हंगरगा (शि.)

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, दापका येस, निलंगा

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, दत्त नगर, निलंगा

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, बँक कॉलनी, निलंगा

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय,पांचाळ कॉलनी, निलंगा

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, कारखाना साइट, झरी

महाराष्ट्र मुलींचे वसतिगृह, निलंगा (विना अनुदानित)

महाराष्ट्र मुलांचे वसतिगृह, निलंगा (विना अनुदानित)

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राजकीय कारकीर्द : मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

सामान्य प्रशासन, गृह खाते, आरोग्य, नगर विकास, माहिती व जनसंपर्क, कायदे, न्याय आणि राजशिष्टाचार (पासून ३ जून, १९८५ ते ७ मार्च १९८६)

प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई (१९९२)

अन्य राजकीय कारकीर्द (मंत्रिमंडळातील सहभाग) : राज्यमंत्री – महसूल, पुनर्वसन व संसदीय कायदा मंत्री (महाराष्ट्र राज्य) १९७४-७५

मंत्री – जलसिंचन मंत्री (१९७७-७८)

मंत्री – सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री, संसदीय कामकाज (महाराष्ट्र राज्य) १९७८

मंत्री – सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य उद्योग, तंत्र शिक्षण आणि प्रशिक्षण, कायदे व न्याय (महाराष्ट्र राज्य) १९८०-८२

मंत्री – जलसिंचन, दुग्ध विकास पशुसंवर्धन, मत्स्य उद्योग, क्रीडा व युवक कल्याण, संसदीय कामकाज, कायदे व न्याय (महाराष्ट्र राज्य) १९८२-८३

मंत्री – जलसिंचन, क्षेत्र विकास प्राधिकरण, कायदे व न्याय आणि सहकार (महाराष्ट्र राज्य) – १९८३-८५

मंत्री – महसूल खाते (महाराष्ट्र राज्य) २००३-०४

निर्वाचित सदस्य (विधानसभा, महाराष्ट्र राज्य) : 

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९६२-६७

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९६७-७२

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९७२-७८

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९७८-८०

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९८०-८५

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९८५-८६

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९८७-९०

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९९०-९५

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : १९९९-०४

विधानसभा, महाराष्ट्र राज्य, मुंबई : २००९-१४

विकासकामे : एक दृष्टीक्षेप 

  1. अंबुलगा (बु.) व किल्लारी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती
  2. महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून राज्यातील सहकार चळवळीचा विकास 
  3. लातूर येथील जवाहर सहकारी सुतगिरणीचे संस्थापक
  4. लातूर व जालना जिल्ह्याच्या निर्मितीत योगदान
  5. औरंगाबाद येथे मुंबई हायकोर्ट बेंच उभारणी
  6. औरंगाबाद येथे महानगरपालिकेची निर्मिती
  7. नव्या विधानसभेच्या इमारतीची उभारणी
  8. निलंगा तालुक्यातील व मतदार संघातील विविध कार्यालयांची निर्मती व इमारतीची उभारणी
  9. मतदार संघातील देवणी व शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीमध्ये योगदान.
  10. निलंगा शहरात उपविभागी कार्यालय इमारत, तहसील कार्यालय इमारत, न्यायालयाची इमारत, बार काउन्सिल इमारत, पंचायत समिती इमारत, पोलिस स्टेशन इमारत, डीवायएसपी कार्यालय ईमारत तसेच देवणी तालुक्यात तहसील इमारत, पंचायत समिती इमारत, ग्रामीण रुग्णालय इमारत, मागासवर्गीय वसतिगृह इमारत, गोडाऊन इमारत इत्यादी इमारतीची उभारणी.
  11. तालुक्यात एकूण ९ आरोग्य केंद्रांची उभारणी.
  12. अंबुलगा येथे ३३ केव्ही उपकेंद्राची उभारणी
  13. तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय विश्रामगृहांची उभारणी

जलसिंचन

महाराष्ट्रातील जलसिंचनात मोठ्या व लघुप्रकल्पाची उभारणी १. लोअर तेरणा, २. उजनी, ३. सिंधफणा, ४. कुकडी, ५. कृष्णा, ६. मांजरा, ७. डिग्वे, ८. अप्पर वर्धा, ९. पेंच, १०. कालीसरा तसेच बॅरेजस १. धनेगाव, मदनसुरी, औराद (श) तालुक्यातील सर्व लघुप्रकल्पांच्या उभारणीत योगदान व मध्यम सिंचन प्रकल्प व बंधारे (उच्चस्तरीय) निलंगा तालुक्यात एकूण ३६ लघुबंधाऱ्यांची उभारणी.

मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीतील विकासकामे

  1. मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी ४२ कलमी कार्यक्रम राबविला.
  2. कोकण विभागाच्या विकासासाठी ४० कलमी कार्यक्रम राबविला.
  3. विदर्भ विभागाच्या विकासासाठीचा ३३ कलमी कार्यक्रम राबविला.
  4. रोजगार हमीवरील मजुरांना मजुरीशिवाय दररोज अर्धा किलो ज्वारी देण्याची एक क्रांतीकारी योजना राबविली.
  5. स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनास वाढ करणारा निर्णय घेतला.
  6. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजात सूट देणारा निर्णय राबविला.
  7. तालुक्याच्या इिकाणी एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय.
  8. मागासवर्गीय वस्त्यांचे संपूर्ण विद्युतीकरण करण्याचा निर्णय.
  9. प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय.
  10. मुंबई शहराच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना.
  11. राज्यातील किमान १० जिल्हा, तालुका न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम अग्रक्रम देऊन पूर्ण केले.

काँग्रेस पक्षातील योगदान

  1. प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१९९१-१९९२)
  2. मुंबई येथे १९८५ मध्ये संपन्न झालेल्या काँग्रेस पक्षाच्या (शताब्दी समारंभ) राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन. पाच लक्ष प्रतिनिधी व ५०० अतिमहत्त्वाचे व्यक्ती विशेष निमंत्रित म्हणून परदेशातून उपस्थित.

मागील तब्बल ६ शतकांपासून सार्वजनिक जीवनात वावरत असताना राष्ट्राच्या व समाजाच्या जडणघडणीच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय राहून अगदी स्वातंत्र्य आंदोलनापासून ते स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कांग्रेस पक्ष संघटनेत व शासन प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातही आपल्या अनुभवाचा कौशल्याने वापर करून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी बाळगून केवळ आपल्या ग्रामीण भागातच उच्चशिक्षणाच्या सुविधा जाणीवपूर्वक निर्माण केल्या. शिक्ष्ज्ञण संस्थेत केवळ गुणवत्तेच्या आधारे नियुक्त्या केल्या. कसलीही देणगी न स्वीकारता विद्यार्थ्यांना शासनमान्य फी स्वीकारून प्रवेश दिले. एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून वाटचाल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *