नांदेड जिल्ह्यात 196 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

नांदेड दि. 5 :- जिल्ह्यात आज 5 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 75 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 196 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 933 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 692 एवढी झाली असून यातील 1 हजार 132 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 444 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 57 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 37 महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे.

मंगळवार 4 ऑगस्ट रोजी नायगाव नांदेड येथील 50 वर्षाची एक महिला, साठेनगर मुदखेड येथील 61 वर्षाचा एक पुरुष शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे तर किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 5 ऑगस्ट रोजी शिवाजी चौक लोहा येथील 74 वर्षाचा एक पुरुष, वाघी रोड नांदेड येथील 52 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, शिवदत्तनगर नांदेड येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 103 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 75 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथील 5, हदगाव कोविड केअर सेटर 10, देगलूर कोविड केअर सेटर 20, खाजगी रुग्णालय 8, मुखेड कोविड केअर सेटर 20, धर्माबाद कोविड केअर सेटर 2, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 10 असे एकूण 75 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 631,घेतलेले स्वॅब- 18 हजार 168,निगेटिव्ह स्वॅब- 14 हजार 156,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 196,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 692,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 13,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,मृत्यू संख्या- 103,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 132,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 444,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 147.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *