राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

पुणे : आज पुण्यात गणपती आमचा किंमत तुमची २०२२ या मनसेने केलेल्या आयेजित केलेल्या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांनी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांनी साद घातली तर एकत्र येऊ देत, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी यावेळी दिली. शर्मिला ठाकरे यांच्याहस्ते व रिटाताई गुप्ता यांच्या उपस्थितीत गणपती आमचा किंमत तुमची २०२२ या शहर मनसे आयोजीत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

पुण्यात मोती चौक, सोन्या मारुती मंदिराजवळ कार्यक्रम होणार आहे. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, महागाई वाढली हे दिसत नसले तर मंत्री खासदार यांचे भत्ते बंद केले पाहिजेत. कोरोना काळात माजी मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले आहे. आम्ही काय चांगल्या इच्छा व्यक्त करतो. इतक्या वर्षात मुंबईतील, महाराष्ट्रातील रस्ते झाले नाही, पाण्याचे प्रश्न सुटले नाहीत.’

स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, या गोष्टीच केव्हाच व्हायला हव्या होत्या. आपण मोठ्या प्रमाणात कर देतो. महाराष्ट्राची कोणती हद्द ओलांडा रस्ते गुळगुळीत दिसतात. खड्डे आपल्याकडेच दिसतात. चांगलं सरकार हवं असेल तर बदल घडवायलाच पाहिजे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

गणपती आमचा, किंमत तुमची – २०२२ या मनसे शहर संघटक प्रल्हाद गवळी आयोजित उपक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला भेटी देऊन उपयोग नाही. लोकांच्या समस्या सुटल्या तर आम्हाला आनंद आहे. आमच्याकडे कोणीही समस्या घेऊन आलं तर राज ठाकरे आपणहून जाऊन त्याची कल्पना देत असल्याचंही त्या म्हणाल्या.