केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; राज्यातून नेहा भोसले प्रथम तर मंदार पत्की दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 4 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून नेहा भोसले
प्रथम तर मंदार पत्की दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानुक्रमानुसार हे दोघे 15 व्या आणि 22 व्या स्थानावर आहेत.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या नागरी परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानुक्रमे नेहा भोसले 15 व्या स्थानावर, मंदार पत्की 22 व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44 व्या स्थानावर,योगेश पाटील 63 व्या स्थानावर,विशाल नरवाडे 91 व्या स्थानावर आहेत.   

जयंत मंकलेंची अंधत्वावर मात : केंद्रीय लोकसेवा आयोगात 143 क्रमांक

पुण्याचा जयंत मंकले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या परीक्षेत 143 वा क्रमांक मिळविला आहे. या आधी जयंतने 2018 मध्ये ही लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती, त्यावेळी त्याचा क्रमांक 937 होता. यावेळी पुन्हा प्रयत्न करीत 143 वा क्रमांक मिळविला.

महाराष्ट्रातील महिला उमेदवारांनीही मारली बाजी

यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार 15 वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (137), अश्विनी तानाजी वाकडे (200), गौरी पुजारी (275), नेहा किरडक (383), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), अंकिता अरविंद वाकेकर (547), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), प्रियंका कांबळे (670), प्रज्ञा खंडारे (719), अनन्या किर्ती (736).

Sumeet Mahajan

औरंगाबाद जि.प.च्या शिक्षण विभागात अत्यंत प्रामाणिक , कर्तव्यदक्षपणे कार्यरत असणारे श्री.राजेश महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा मुलगा.सुमितने UPSC परीक्षेत उंच भरारी घेत IAS झाला आहे. सुमितने देशात २१४ वी रँक मिळविली आहे.       

 Dr Neha Laxman Kirdak .
got 383 All over India in UPSC 2019

#नेहा_लक्ष्मण_किद॔क यांची UPSC CIVIL SERVICE मधुन RANK 383 भारतीय प्रशासकीय सेवेत निवड

एक नजर निकालावर

 केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीर झाला. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 829 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –304, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस)78, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 251, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 129, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 67 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 60 शारिरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 182 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 91, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)-09,  इतर मागास वर्ग -71, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती  – 03 उमेदवारांचा समावेश आहे. 

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –52, अनुसूचित जाती (एस.सी.) –25, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 24 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 12, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 02,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 06, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०3, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 01 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60,  उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 15,  इतर मागास प्रवर्गातून – 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 23, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 10  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 438 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 196 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  34, इतर मागास प्रवर्गातून – 109, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 64 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 35 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 135  जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -57, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 14  उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 14  तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 08 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

या परीक्षेत यश मिळविणाऱ्या  महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये यांचा समावेश आहे. –

अभिषेक सराफ (8), नेहा प्रकाश भोसले (15), मंदार जयवंतराव पत्की (22), आशुतोष कुलकर्णी  (44), दिपक करवा (48),  योगेश अशोकराव पाटील (63), विशाल तेजराव नरवडे (91), मयुर खंडेलवाल (106), राहूल लक्ष्मण चव्हाण (109), विनोद पाटील (132), कुलदिप जंगम (135), नेहा दिवाकर देसाई (137), जयवंत किशोर मनकाळे (143), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (151), शेख मोहमद झेब झाकीर (153), अश्विनी तानाजी वाकडे (200), सागर भारत मिसाळ (204), माधव विठ्ठलराव गित्ते (210), कुणाल मोतीराम चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमित महाजन (214), श्रेणिक लोढा (221), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), आयुष खरे (267), गौरी पुजारी (275), गजराज बच्छावत (277), शंतनु अत्रे (281), प्रसाद शिंदे (287), रजनिश पाटिदार (307), आकाश अग्ले (313), मंदार देशपांडे (334), रजत उभयकर (378), आदित्य काकडे (382), नेहा किरडक (383), निमिश पाटील (389), महेश गिते (399), अभिषेक शिवहरे (414), कांतीलाल सुभाष पाटील (418), अमित कुमावत (423), अविनाश जगधवर (433), परमानंद प्रविण दराडे (439), स्वप्नील पवार (448), ऋषिकेश जयसिंग देसाई (481), नकुल राजेंद्र देशमुख (489), शुभ्रमण्य भालचंद्र केळकर (497), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), सुमित कैलास जगताप (507), दिपक धनखेर (520), प्रसन्न लोढा (524), नवनाथ शिवाजी माने (527), प्रफुल्ल देसाई (532), वैभव हिरवे (541), अंकिता अरविंद वाकेकर (547), विजयसिंहराव साहेबराव गिते (550), समिर प्रकाश खोडे (551), सुरेश कैलासराव शिंदे (574), अभिनव प्रविण इंगोळे (624), अजय गणपती कुंभार (630), स्वप्नील जगन्नाथ पवार (635), अभिषेक दिलीप दुधाळ (637), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), अशित कांबळे (651), करूण गरड (656), प्रियंका कांबळे (670), ऋषिकेश देशमुख (688), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकटे (710), प्रज्ञा खंडारे (719), साकेत धवने (727), निखिल दुबे (733), राजीव मेश्राम (735), अनन्या किर्ती (736), शशांक माने (743), निखील कांबळे (744), सुमित रामटेके (748), शुभम भैसारे (749), निलेश गायकवाड (752), कुणाल उत्तम शिरोटे (765), वैभव वाघमारे (771), अश्विन गोलपकर (773), विधित्या नायक (780), किशोर सुत्रधार (784), सरगम शिंदे (785), सर्वेश सोनवाणी (787), अजिंक्य विद्यागर (789), सत्यजित यादव (801), समिर महाजन (810), सुनिल शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दिक्षित (827).  

यापैकी यशस्वी झालेल्या 66 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे.

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

00000

टिप : राज्यनिहाय यादी जाहीर होत नसल्यामुळे काही नावे सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *