बलात्‍कार करणाऱ्या नराधम तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी आणि ९४ हजार रुपयांची दंडाची शिक्षा

औरंगाबाद,​२०​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-घरात घुसून १२ वर्षीय पीडितेवर बलात्‍कार करणाऱ्या नराधम तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ९४ हजार रुपयांची दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. रामराव अश्रुबा साबळे (२५, रा. जांब आंध ता. सेनगाव जि. हिंगोली ह.मु. हर्सुल परिसरा) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात १२ वर्षीय पीडितेच्‍या वडीलांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीला १३, १२ आणि ११ वर्षांच्‍या अशा तीन मुली आहेत. ११ नोव्‍हेंबर २०१९ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्‍या सुमारास फिर्यादीये हे कामासाठी बाहेर गेले होते. तर फिर्यादीची पत्‍नी स्‍वयंपाकाच्‍या कामासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेली होती. आणि १३ वर्षीय मुलगी ही दिवाळी निमीत्त मामाच्‍या घरी गेली होती. त्‍यामुळे घरी पीडिता व तिची लहान बहिण असे दोघेच होते. दुपारी दोन वाजेच्‍या सुमारास फिर्यादीने जवेण करण्‍यासाठी घरी आले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद होता. तर फिर्यादीची लहान मुलगी ही गच्‍चीवर होती, पीडिता ही घरात असून ती दरवाजा उघडत नसल्याचे तिने फिर्यादीला सांगितले. फिर्यादीने पीडितेला दार उघडण्‍यासाठी आवाज दिला, मात्र पीडितेने दरवाजा उघडला नाही. त्‍यामुळे फिर्यादीने जीन्‍याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, मात्र बेडरुमचा दरवाजा बंद होता. फिर्यादीने बेडरुच्‍या खिडकीतून आत डोकावले असता, परिसरात राहणारा आरोपी हा पीडिते सोबत अश्लिल कृत करतांना दिसला. फिर्यादीने आवाज देत गल्लीतील मीत्राला बोलावले. व खिडकीतून बेडरुममध्‍ये प्रवेश केला. त्‍यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

दरम्यानच्‍या काळात पीडितेची आई घरी आली. तिने पीडितेकडे चौकशी केली. त्‍यावर पीडिता म्हणाली की, आरोपी हा अचानक घरात शिरुन त्‍याने दरवाजा बंद केला. व पीडितेला बेडरुममध्‍ये घेवून गेला. त्‍यानंतर आरोपीने तुला धडधड होत आहे का घाबरु नको आण तुझ्याच घरात आहोत असे म्हणत तिच्‍याशी अश्लिल चाळे सुरु केले. आरोपीने पीडितेवर बलात्‍कार केला, त्‍याच वेळी फिर्यादीने दरवाजा ठोठावला. प्रकरणात हर्सुल पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक एन.ए. कामे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता ज्ञानेश्‍वरी नागुला/डोली यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात पीडिता, फिर्यादी, शाळेचे पाचार्य आणि डॉक्‍टरांची साक्ष महत्‍वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी रामराव साबळे याला दोषी ठरवून भादंवी कलम ४५२ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि ६ हजार रुपयांचा दंड, कलम ३७६ २(i) अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, कलम ३५४ अन्‍वये १ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड, कलम ३४२ अन्‍वये ६ महिने सक्तमजुरी आणि पोक्सोच्‍या कलम ४ (२) अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजाररुपये दंड, कलम ८ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, कलम १२ अन्‍वये १ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार एस.के. रज्जाक यांनी काम पाहिले.