जालन्यात मका खरेदी रखडली , 20 हजार क्विंटल मका खरेदी करणे बाकी 

केंद्रावर 130 वाहने गेल्या सात दिवसापासून उभी  
भोकरदन तालुक्यात अद्यापही 20 हजार क्विंटल मका शेतकऱ्याकडे पडून आहे
आतापर्यंत 5 कोटी 55 लाख 73 हजार 760 रुपयांची  31 हजार 576 क्विंटल मका खरेदी
Displaying IMG-20200804-WA0016.jpg
सुरेश केसापूरकर 

जालना :भोकरदन येथील मका खरेदी केंद्रावर 130 वाहने गेल्या सात दिवसापासून उभी आहेत.तर काही शेतकऱ्यांनी मका परत घरी नेली तर काहींनी भोकरदन येथे भाड्याने घर घेऊन त्या मध्ये मका साठवला आहे.  20 हजार क्विंटल मका खरेदी करणे बाकी  असून पावसामुळे  केंद्रावर उभ्या असलेल्या वाहनातील मकाला पोत्यामध्येच कोंब (अंकुर) फुटले आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी  खरीपमध्ये  कापुस व मका या पिकाची लागवड करतात  उत्पादन या  भागात मोठया प्रमाणात होते  रब्बीच्या  हंगामात मकाचे उत्पादन चांगले झाले व मार्च नंतर  कोरोना आला त्यामुळे सर्व पोल्ट्री फोंर्म बंद पडले त्याचा सर्वात मोठा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला बाजार पेठेत मका  1 हजार ते 1200 या भावाने खरेदी करण्यात आली मात्र मका चा  शासनाचा हमी भाव 1760 असल्याने केंद्र व राज्य सरकारने मका खरेदीसाठी जुलै महिन्यात सुरुवात केली  पंधरा दिवसात बंद केली त्यानंतर 24 जुलै रोजी परत मका खरेदी सुरू केली व 30 जुलै रोजी बंद केली त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली 

Displaying IMG-20200804-WA0018.jpg

शेतकऱ्यांनी मका विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली व त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मका खरेदी केंद्रावर घेऊन या अशा आशयाचे एसएमएस पाठविण्यात आले त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी 24 जुलै पासून 1 हजारापेक्षा जास्त वाहने घेऊन शेतकरी खरेदी केंद्रावर आले त्या पैकी काही वाहनातील मका खरेदी करण्यात आली मात्र 30 जुलै रोजी दुपारीच पोर्टल बंद झाल्याचे कारण सांगून मका खरेदी बंद करण्यात आली शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली  शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला, रस्ता रोको आंदोलने केले तरी काही उपयोग झाला नाही, तहसिल कार्यालयाच्या वतीने   मोजणी बाकी असलेल्या 361 शेतकऱ्यांच्या 310 वाहनाचे पंचनामे करण्यात आले शासनाने मका खरेदी पुन्हा सुरू केली तर तुमची मका खरेदीला प्राधान्य देऊ असे लेखी पत्र दिले त्यानंतर काही शेतकऱ्यांनी मका परत घरी नेली तर काहींनी याच केंद्राबाहेर वाहने उभी केली तर काहींनी भोकरदन शहरात भाड्याने गोडाऊन घेऊन त्यामध्ये मका ठेवली आहे.

मकाला फुटले कोंब

शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून मका खरेदी केंद्रावर आणली आहे मात्र ती खरेदी करण्यात आली नाही त्यामुळे ट्रक, टॅक्टर, आयशर या गाडीत ताडपत्रीने झाकली आहे मात्र वरून पाऊस सुरूच आहे त्यामुळे वाहनातील मकाच्या पोत्यातील मकाला कोंब (अंकुर)आले आहे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

करजगाव येथील शेतकरी कैलास पाचंगे यांनी सांगितले की त्यांनी 25 मे रोजी मका ऑनलाइन केली त्यानंतर 26 जुलै रोजी मका घेऊन या असे एसमएस आला 27 जुलै ला दोन वाहने भाड्याने केली व मका भोकरदन च्या केंद्रावर आणली व 30 ला मका खरेदी बंद झाली तेव्हापासून वाहन केंद्रावर उभे आहे जर मका खरेदीच करायची नव्हती तर शेतकऱयांना मका घेऊन या असे एसमएस का सोडले त्यामुळे मोठे नुकसान झाले असुन हा शेतकऱ्यावर अन्याय आहे ज्या शेतकऱ्यांनी वाहने केंद्रावर आणली आहे त्यांची मका शासनाने खरेदी केलीच पाहिजे नसता तहसिल कार्यालयाच्या आवारात ही मका ठेवण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.

Maize.jpg


 तहसिलदार संतोष गोरड यांनी सांगितले की शासनाच्या वतीने पुन्हा मका खरेदीला परवानगी आली तर या शेतकऱ्यांची मका प्राधान्याने खरेदी करण्यात येईल परवानगी वाढून मिळावी यासाठी जिल्हाधिकार्यांनी  प्रस्ताव पाठविला आहे असे गोरड म्हणाले शिवाय गोडाऊन ची सुध्दा व्यवस्था केली आहे असे ते म्हणाले . जळगाव सपकाळ येथील शेतकरी सुभाष सपकाळ यांनी सांगितले की , मका मोजणीसाठी नंबर जवळ आला व खरेदी बंद झाली गाडी भाड्याची असल्याने परवडले नाही सध्या मका भोकरदन येथे भाड्याच्या गोडाऊन मध्ये ठेवली आहे.

Displaying IMG-20200804-WA0011.jpg


पारध येथील शेतकरी रामेश्वर लक्कस यांनी सांगितले की  सात आठ दिवसापासून मकाचे वाहन केंद्रावर उभे आहे पावसामुळे पोत्यानमध्येच कोंब फुटले आहे मका खरेदी बंद करून शेतकऱ्यावर मोठा अन्याय केला आहे अधिकारी सुध्दा व्यवस्थित बोलत नाही असा आरोप त्यांनी केला आहे. मोरेश्वर खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शौकत अली यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर पोर्टल बंद झाले व 30 जुलै रोजी शासनाने मका खरेदी बंद केली त्यावेळी तालुक्यातील 310 वाहने बाहेर उभी राहिली होती आत्तापर्यंत  31 हजार 576 क्विंटल मका खरेदी करण्यात आली असुन 34 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.  शासनाने पुन्हा खरेदीला परवानगी दिली तर राहिलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात येईल असे शौकत अली यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *