औरंगाबाद जिल्ह्यात 11229 कोरोनामुक्त, 3178 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादेत ३४१ नवे बाधित,पुन्हा पार झाला तीनशेचा आकडा

औरंगाबाद, दि.03 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 328 जणांना (मनपा 156, ग्रामीण 172) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 341 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14894 झाली आहे. आजपर्यंत एकूण 487 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3178 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तिघांचा मृत्यू;एकूण करोना बळी ४८७

शहरातील ४५ ते ६५ वयोगटातील तीन करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८७ झाली आहे. त्याचवेळी सोमवारी (३ ऑगस्ट) अनेक दिवसांनी तब्बल ३४१ बाधितांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४,८९४ झाली आहे.

शहरातील न्यू हनुमान नगर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला २६ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याच दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी (२ ऑगस्ट) रात्री साडेनऊ वाजता मृत्यू झाला. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील कृष्णा नगर येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाला १२ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी मृत्यू झाला. रामनसपुरा येथील ४५ वर्षीय महिला रुग्णाला २० जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहलावावरुन निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३७२, तर जिल्ह्यात ४८७ बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

दुपारनंतर 250 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 59, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 71 आणि ग्रामीण भागात 70 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *