न्यूयॉर्कमध्ये लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

न्यूयॉर्क : बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.

चौटौका संस्थेच्या व्यासपीठावर एका व्यक्तीने व्याख्यानापूर्वी ७५ वर्षीय सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या वादग्रस्त लिखाणामुळे त्यांना सन १९८०च्या दशकात इराणकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या २० वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. त्यांची पहिली कादंबरी १९७५ मध्ये आली. त्यांना त्यांच्या मिडनाइट्स चिल्ड्रन १९८१ साठी बुकर पारितोषिक देखील मिळाले. ही कादंबरी आधुनिक भारताबद्दल आहे. त्यांचे चौथे पुस्तक, द सॅटॅनिक व्हर्सेसमुळे १९८८ त्यांना वादात अडकावे लागले होते. सलमान रश्दी यांना त्यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तका त्यांना अनेक धमक्या देखील आल्या आहेत. या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे.