भारताने 2 कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार

दहा लाख लोकांत 14,640 चाचण्या,11.8 लाख लोक झाले बरे

भारताने आतापर्यंत  2,02,02,858 कोविड-19 चाचण्या पूर्ण करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आक्रमकतेने चाचण्या करणे, कार्यक्षमतेने माग काढणे ,विलगीकरण  आणि  त्वरित उपचार या  केंद्रसरकारच्या महत्वपूर्ण धोरणाचा वापर कोविड-19च्या व्यवस्थापनासाठी करत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी याचा  अवलंब केल्याने हे शक्य झाले आहे. या धोरणाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे देशभरातील कोविड चाचण्यांचा वेग वाढला असून व्यापक प्रमाणात  लोकांना या चाचण्यांचा लाभ घेता येत आहे.

गेल्या 24 तासांत 3,81,027 चाचण्या पूर्ण झाल्या असून, दर दहा लाखांत 1,4640 इतका या चाचण्यांचा (IPM) वेग वाढला आहे.देशात सध्या दर दहा लाखांत  14,460 इतक्या चाचण्या होत आहेत. देशातील चाचण्यांचा(TPM) वेग सातत्याने वाढत असताना 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हा दर देशातील सरासरीपेक्षा जास्त आहे.

States TPM 030820 (1).jpg

देशातील प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करण्यात येत असून देशात आता एकूण 1348 प्रयोगशाळा असून त्यापैकी 914 सरकारी तर 434खाजगी आहेत. त्या खालीलप्रमाणे

● रीअल टाईम आरटी पीसीआर आधारित प्रयोगशाळा: 686 (सरकारी :418+ खाजगी :268)

● ट्रू नँट आधारित प्रयोगशाळा:556 (सरकारी:465 + खाजगी: 91)

● सीबीनअँअँट आधारित प्रयोगशाळा:(सरकारी :31+ खाजगी:75)

पुणे येथील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी

भारत सरकारच्या औषध नियंत्रकांनी पुण्यातील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला आँक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेका सोबत  देशात कोविड विरोधी लस बनविण्याच्या (COVIDSHIELD) क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या आणि  तिसऱ्या  टप्प्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे कोविड विरोधी लस बनविण्याच्या कार्याला वेग येईल.

दरम्यान भारताच्या रुग्ण मृत्यू दरात आणखी घट झाली असून जगाच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे. आज तो 2.11% इतका झाला आहे. कोविड व्यवस्थापनाच्या ‘टेस्ट,  ट्रॅक अँड ट्रीट’  या उत्तम आणि परीणामकारक कार्यवाहीमुळे देशात हा दर गाठणे शक्य झाले आहे.

कोविड व्यवस्थापनाच्या धोरणाचे लक्ष्य त्वरित शोध, विलगीकरण,आणि रुग्णांचे सुरळीत व्यवस्थापन आणि अधिक धोकादायक लोकसंख्येच्या विभागात वैद्यकीय  कर्मचाऱ्यांची सेवा यामुळे देशात रुग्ण बरे होण्याच्या दरातील वाढ शक्य झाली आहे. गेल्या 24 तासात 40,574रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोविड  रुग्णांची संख्या 11,86203 इतकी झाली असून बरे होण्याचा दर 65.77% इतका झाला आहे.

दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील फरक 6 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या तो 6,06,846 इतका आहे.  सध्या   5,79357 एवढे  रुग्ण उपचाराधिन आहेत.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने परदेशातून परतणाऱ्या नागरीकांसाठी 24मे 2020 रोज जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांची फेररचना केली आहे. दि.8 ऑगस्ट 2020 रात्री एक वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *