नांदेड जिल्ह्यात 203 कोरोनाबाधितांची भर तर चौघांचा मृत्यू

नांदेड दि. 3 :- जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 66 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 203 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 106 अहवालापैकी 854 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 359 एवढी झाली असून यातील 1 हजार 20 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 232 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे.

रविवार 2 ऑगस्ट रोजी देगलूर येथील 72 वर्षाची एक महिला, चौफाळा नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, नाटकार गल्ली देगलूर येथील 56 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 3 ऑगस्ट रोजी फुलेनगर कंधार येथील 65 वर्षीय महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 94 एवढी झाली आहे.

अँटिजेन तपासणीद्वारे 79 बाधित आढळले. जिल्ह्यात 1 हजार 232 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 476,घेतलेले स्वॅब- 16 हजार 686,निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 147,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 203,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 359,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 28,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,मृत्यू संख्या- 94,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 20,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 232,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 47.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *