मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पिकांच्या नुकसानाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

हिंगोली ,​८​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नांदेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर हिंगोली येथे येताना कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.  तसेच  यापुढे अशा प्रकारे  नुकसान पुन्हा होऊ नये याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी तहसीलदार सुरेखा नांदे यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

साकडे भोलेनाथाला

Image

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिरात उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवान शिवशंकराची मनोभावे पूजन करून जलाभिषेक केला. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव व यंदाच्या वर्षी बळीराजाला उत्तम पीक पाणी मिळू देत असे साकडे भोलेनाथाला घातले.

Image