करंजगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

वैजापूर,​८​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील कंरजगाव येथील एका शेतकऱ्यांने विष प्राशन करुन आत्महत्या केली.ही घटना रविवारी घडली.चांगदेव अशोक काळंगे ( वय 36 वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

चांगदेव काळंगे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे तसेच खासगी कर्ज होते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कोणतेही पिक त्यांना झालेले नव्हते. बॅकेचे व इतर देणे असल्यामुळे अनेक दिवसापासून ते चिंताग्रस्त होते. उत्पन्न नसल्याने ते कर्ज फेडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली.या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.