करुणा निकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.बोरणारे यांच्या हस्ते सत्कार

वैजापूर,​८​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-शहरातील करुणा निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आला.आ.बोरणारे यांनी त्यांच्यावतीने शाळेतील 101 गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरण करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी माजी  नगराध्यक्ष साबेर खान, माजी नगरसेवक राजेंद्र पाटील साळुंके, वसंत त्रिभुवन, प्रकाश पाटील मतसागर, पंचायत समिती सदस्य बद्रीभाऊ चव्हाण, रामभाऊ धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. बोरणारे व मा.नगराध्यक्ष साबेर खान यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्यासंख्येने यावेळी उपस्थित होते.