औरंगाबादेत २२६ नवे कोरोनाबाधित,७ बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद,2:

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २२६ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबधितांची संख्या १४,५५३ झाली आहे. तसेच रविवारी जिल्ह्यात ३०० बाधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले. यामध्ये शहरातील १६७ व ग्रामीण भागातील १३३ व्यक्तींचा समावेश असून, आतापर्यंत १०,९०१ बाधित हे करोनामुक्त झाले आहेत. त्याचवेळी रविवारी ६ बाधितांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या ४८४ झाली आहे आणि सध्या ३,१६८ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील सहा, तर परभणी जिल्ह्यातील एक, अशा ४० ते ८३ वयोगटातील सात करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) तसेच खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ४८४ झाली आहे. त्याचवेळी रविवारी (२ ऑगस्ट) दिवसभरात २२६ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४,५५३ झाली आहे.

नवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाला २४ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा शनिवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील राहूल नगर, रेल्वे स्टेशन येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाला २७ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा शनिवारी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी मृत्यू झाला. शहरातील इंदिरानगर-बायजीपुरा येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाला ३१ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. जयभवानी नगर येथील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला ३० जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. सिडको एन-पाच परिसरातील ८३ वर्षीय पुरुष रुग्णाला ३० जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रविवारी दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी मृत्यू झाला. तसेच खडकपुरा (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी पहाटे तीन वाजता मृत्यू झाला. तर, हर्सूलच्या भगतसिंग नगरातील ५१ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३६९ बाधितांचा, तर जिल्ह्यात ४८४ बाधितांचा मृत्यू झाला, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *