बीडच्या अविनाशने रचला इतिहास; स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक

बर्मिंगहम : बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने रौप्य पदक भारताला मिळवून दिले आहे.

महाराष्ट्रातील बीड येथील रहिवासी असलेला अविनाश साबळे याने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले. यासह त्याने ३००० मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला.

सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त ०.५ सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने ८.११.१५ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी केनियाच्या आमोस सेरेमने ८.१६.८३ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.