अमित शाह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची  लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अमित शाह रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार आहेत.

त्यांनी ट्विट केल्यानुसार – त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येत होती. त्यांनी चाचणी केल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी पुढे लिहिले आहे की – त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय ऐश्वर्या, आराध्यासह अभिषेक बच्चनही पॉझिटिव्ह आढळून आले होते.

दरम्यान उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्षही स्वतंत्र देव हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *