नांदेड जिल्ह्यात 170 कोरोनाबाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू

नांदेड दि. 2 :- जिल्ह्यात आज 2 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 19 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 170 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 576 अहवालापैकी 407 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 156 एवढी झाली असून यातील 954 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 101 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे.

शुक्रवार 31 जुलै रोजी नांदेड गोकुळनगर येथील 59 वर्षाचा एक पुरुषाचा तर शनिवार 1 ऑगस्ट रोजी वजिराबाद नांदेड येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा नांदेड येथील खाजगी रुग्णालयात तर लोहा तालुक्यातील जानापूरी येथील 65 वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावला. रविवार 2 ऑगस्ट रोजी तळ्याची वाडी कंधार येथील 67 वर्षाची एक महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, नारायणनगर नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुषाचा व महालिंगी कंधार येथील 51 वर्षाचा एक पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर वसंतनगर नांदेड येथील 72 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले.आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 90 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 19 कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.23 अँटिजेन तपासणीद्वारे बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 101 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 430,घेतलेले स्वॅब- 16 हजार 206,निगेटिव्ह स्वॅब- 12 हजार 711,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 170,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 156,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 03,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 80,मृत्यू संख्या- 90,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 954,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 101,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 032.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *