जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये तैनात जवानांना ईशान्येकडील बहिणींनी केंद्रिय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत बांधली राखी
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2020
बंधुता, एकता आणि ऐक्याचे प्रदर्शन करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात आज ईशान्येकडील भगिनींनी जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या तुकड्यांमधील सशस्त्र आणि निमलष्करी दलाच्या जवानांना राखी बांधली.

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र अधिभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक, निवृत्तीवेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ, डॉ. जितेंद्र सिंग यांच्या पुढाकाराने उद्याच्या रक्षाबंधन उत्सवाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेण्यात आला. जम्मू आणि काश्मिर आणि लडाख येथे तैनात असलेल्या लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांना अरुणाचलप्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडच्या आठ राज्यांतील बचतगटांनी राखी, तिरंगी बँड आणि फेस मास्क पाठविले. अशा प्रकारे विविध संस्कृती, राज्ये आणि भारतातील लोकांमध्ये जन्मजात बंध एकत्र आणत आहेत.