उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांचा हल्ला

पुणे ,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला.

Uday Samant's car attacked in Katraj, Pune - Hindustan Times

पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.

शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान कात्रज भागात आज आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना वाहतूक खोळबंली होती, यादरम्यान शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे.