नव तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांना सुविधा द्या -सुनील चव्हाण

औरंगाबाद,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम महसूल विभाग करतो. या विभागाने सर्वसामान्यांना अधिक गतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जर्नादन विधाते, तहसीलदार संजय वारकड, वैशाली डोंगरजाळ आदी उपस्थित होते.

महसूल विभाग सर्व आपत्तीच्या परिस्थितीत काम करतो. शेतकरी, मजूर, विधवा, निराधार यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करतो. नवीन तंत्रज्ञानाने सर्व कामे सुलभ आणि वेळेत, पारदर्शक पद्धतीने होतात. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल. तो कायम ठेवण्यासाठी नाविण्यपूर्ण योजना, उपक्रमांचे आयोजन करावे. शेतरस्ता, घरकुल उपलब्ध करण्याची मोहीम महसूल विभागांनी जिल्ह्यात प्रभावी राबवावी, कोरोना कालावधीत  आपत्तीवर मात करण्यासाठी महसूल विभागाने कामे केली. ती कामे उल्लेखनीय असून याबद्दल सर्वांचे अभिनंदन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.

            जिल्हास्तरावरील 2021-22 या वर्षातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे, उपविभागीय अधिकारी डॉ.माणिक आहेर,  फुलंब्रीच्या तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार योगिता खटावकर, लघुलेखक डी.एल. आटुळे, अव्वल कारकून गटात- गजानन हेकाडे, रवींद्र टोणगे, सत्यजीत आव्हाड, कविता गडप्पा, पारस पेटारे, डी.के.जिरगे, मंडळ अधिकारी संवर्गातून एस.एम.जोशी, देवराव गोरे, अशोक तांबुस, तलाठी संवर्ग निलेश आहेर, ज्ञानेश्वर शिंदे, बाबा जानी शेख, श्रीमती एस.मोरे, राजेंद्र आठवले, महसूल सहायक संवर्गात राजू देवळे, जीवन चव्हाण, विजय भंडारे, संदीप हापत, श्रीमती वामणे, राजेंद्र आव्हाड, वाहन चालक संजय राहाणे, शिपाई संवर्गात सुभाष बन, शेख उस्मान, अनिल पवार, शेख फारुख, किशोर काळे, राजू शेख तर कोतवाल संवर्गात शीतल सोनवणे, रवी भगत, संजय नावकर, संजय शरणात, भारत गायके यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते सर्व अधिकारी कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.