वैजापूर बाजार समितीचे माजी संचालक हरिभाऊ परदेशी यांचे निधन

वैजापूर,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विरगाव येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ दामुसिंग परदेशी (65) यांचे सोमवारी निधन झाले.  त्यांनी विरगाव सोसायटीचे अध्यक्ष, वैजापूर खरेदी विक्री संघाचे संचालक, वैजापूर बाजार समितीचे संचालक आदी पदे भुषवली.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, दोन भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे.ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब परदेशी यांचे ते चुलते होत.विरगाव येथे त्यांच्या वस्तीवर त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.