राज ठाकरेंचे राऊतांच्या अटकेचे भाकित खरे ठरले!

मुंबई : संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तीन-चार महिन्यांपूर्वीची वक्तव्ये चर्चेत आली आहेत. या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज ठाकरेंनी केलेले भाकित खरे ठरल्याची चर्चा रंगली आहे.

काल (३१ जुलै) दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून दुपारी ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा अटक करण्यात आली. दरम्यान संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या भाकितावर जोरदार चर्चा रंगली आहे.१२ मार्च २०२२ रोजी पत्रकारांनी राज ठाकरेंना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. ‘आमचे राजकारण मिमिक्रीवर चालत नाही’, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर ‘आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,’ असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले होते.तर १२ एप्रिल २०२२ रोजी एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, “आज पवारसाहेब संजय राऊतांवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.”

या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते की काय, अशीही चर्चा रंगली आहे