‘सिल्लोड’मधील विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

औरंगाबाद,३१ जुलै /प्रतिनिधी :- सिल्लोडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  सिल्लोड शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, स्व.बाळासाहेब ठाकरे चौक, नगर परिषद प्रशासकीय इमारत, नगर परिषद प्रशाला बांधकाम व भराडी येथील नॅशनल सूतगिरणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार आदी यावेळी उपस्थित होते.