‘कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय’, उद्धव ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा

मुंबई ,३०जुलै /प्रतिनिधी :- राज्यपाल पदाचा अवमान करु इच्छित नाही. त्या खुर्चीचा मान, त्या खुर्चीत बसणाऱ्याने सुद्धा ठेवला पाहिजे. महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात. तीन वर्षे महाराष्ट्रात राहून सगळं ओरबाडलं आहे. कोल्हापूरचा जोडा सुद्धा त्यांना दाखवायची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. 

राज्यपाल यांना विधानपरिषद जागा भरण्यातही रस दिसत नाही. राज्यपाल नियुक्त सदस्य नेमुच नये, अशी तरतूदच त्यांनी करायला हवी. आज त्यांनी कहर केलाय दिल्लीतून अशी भाषणं त्यांना लिहून येतात का कल्पना नाही. ही मुंबई हक्काने मिळवली आहे. कोणी आंदण दिलेली नाही. मराठी माणसाच्या मनात त्यांनी आग लावलीच आहे. पण हे राष्ट्रपतीचे दूत असतात शपथ घेताना जात- पात धर्म बाजूला ठेवून ते वागणूक देतात. त्यांनी हे कर्तव्य मोडले आहे, त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? असे उद्धव ठाकरे  म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ कोणी कसा घेईल हे माहिती नाही. जोड्याचा उपयोग, कोण कसा करेन याची खात्री नाही. कोश्यारी यांचं भाषण मुंबईतून दिलं जातं की दिल्लीतून लिहून दिलं जातं हे माहिती नाही, असंही ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान करून त्यांनी मराठी माणसाच्या मनात आग लावलीच आहे. याधीही त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दक हिंसक उदगार काढले. यानंतर आता मराठी माणसाचा अपमान केला. राज्यपाल पदाचा अवमान मला करायचा नाही. त्या खुर्चीवर बसणाऱ्याने हा मान राखायला हवा. भगतसिंग कोश्यारी या व्यक्तीनं हा मान ठेवला नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

राज्यपालांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायची, याबद्दल विचार करण्याची वेळ आली असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम कोश्यारींनी केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्या महाराष्ट्राचं मीठ खाल्लं तिथेच नमकहरामी केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे नीच काम त्यांनी केले आहे. ज्या महाराष्ट्रचे मीठ खात आहेत त्यात नमकहरामी केली आहे. हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आगी लावत असेल तर तात्काळ वरिष्ठ थरावर निर्णय घ्यावा. त्यांच्या खुलासाबद्दल मला बोलायचं नाही. त्यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे. त्यांचं वक्तव्य केवळ ओठातून की त्यांच्या पोटात बसून कोणी दुसऱ्याने आणलंय हा संशोधनाचा विषय. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत आहे. तो का ? कारण पैसा अनावधनाने त्यांनी हा हेतू बोलण्यातून स्पष्ट केले आहे. त्यांचा डोळा मुंबईच्या पैशांवर आहे एवढेच सांगेन, असे ते म्हणाले.