प्रमोद राठोड यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी निवड

औरंगाबाद | दि. २: 
माजी उपमहापौर तथा महानगर पालिका भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांच्या भारतीय जनता पार्टी च्या महराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रमोद राठोड यांना दिले आहे. 
गेल्या दहा वर्षांपासून प्रमोद राठोड यांनी एन -३, तसेच एन -४ विश्रांती नगर या वार्डाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप पक्षाने शहराचे उपमहापौर पद तसेच महानगर पालिकेच्या भाजप पक्षाचे गटनेते पदाची संधी दिली आहे.उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि भाजप पक्षातील प्रामाणिक कामगिरीमुळे त्यांची भारतीय जनता पार्टी च्या महराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *