दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

औरंगाबाद,३० जुलै /प्रतिनिधी :- सत्र न्यायालयातील कार्यरत अतिरिक्त लोकाभियोक्ता, सरकारी अभियोक्त्या यांच्‍या दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विशेष सरकारी अभियोक्ता उज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा न्‍यायालयातील सरकारी वकील व लोक अभियोक्ता कार्यालय, औरंगाबाद तर्फे आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे होते.

या प्रसंगी अति. लोक अभियोक्ता मधुकर आहेर यांची कन्या श्रावणी (९७. ६०% सीबीएससी बोर्ड दहावी), अति. लोक अभियोक्ता बी.आर. लोया यांचे चिरंजीव आदित्य (८७% आयसीएससी बोर्ड दहावी), अति. सरकारी अभियोक्ता एस.एम. सोनटक्के यांचे चिरंजीव साकेत (९०.५०% बारावी विज्ञान), अति. सरकारी अभियोक्ता एस.एस. बर्वे यांचे चिरंजीव रोहित (८०.३३% बारावी विज्ञान) यांच्या विशेष यश संपादनाबद्दल तसेच अति. लोक अभियोक्ता राजू पहाडीया यांची कन्या कु. तनुश्री ही राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर येथे प्रविष्ट झाल्याबद्दल सत्कार आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अति. लोक अभियोक्ता सूदेश शिरसाठ यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन अति. सरकारी अभियोक्ता एस.एस. बर्वे यांनी केले. या प्रसंगी अतिरिक्त सरकारी वकील एस.व्ही. मुंडवाडकर, अति. लोक अभियोक्ता के.एन. पवार, मधुकर आहेर, डि.के. नागुला, अरविंद बागुल, अजित अंकुश, शरद बांगर, अनिल हिवराळे, बी.एम. मेहर, बि.आर. लोया, आर.एस. पहाडीया, आर.सी. कुलकर्णी, व्ही.के. कोटेचा, उल्हास पवार तसेच अति. सरकारी अभियोक्ता एन.एन. पवार, एस.एम. सोनटक्के, ए.बी. येगावकर, बी.एम. लोमटे, मनीषा गंडले, डी.ए. वाकणकर, एम.एम. अदवंत, ए.बी. करंडे, एस.बी. सूर्यवंशी, बी.एन. आढावे यांची उपस्थिती होती.