दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीने केलेल्या आंदोलनाला राज्यात प्रचंड प्रतिसाद

औरंगाबाद शहरात महाएल्गार आंदोलन

मुंबई,औरंगाबाद 1 ऑगस्ट 2020

दुधाला सरसकट १० रु. / लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे या मागणीसाठी  आज भाजपा, रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) महायुतीतर्फे राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील,  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर आदी सहभागी झाले होते.

रास्ता रोको करून तसेच गरजूंना दूध वाटप करून हे आंदोलन शांततेत पार पडले. लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील यांनी मावळ तालुक्यात या आंदोलनात सहभाग घेतला. रासप चे प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांती चे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करत आंदोलनात भाग घेतला. राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्यास या पुढील काळात आणखी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी महायुतीतर्फे 20 जुलै रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. दुग्ध विकास मंत्र्यांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांसंदर्भात बैठकही बोलावली होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करून त्या संदर्भात कसलाही निर्णय न घेतल्याने महायुतीतर्फे आजचे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

            महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला  जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

अशा परिस्थितीत दुधाला सरसकट १० रु. / लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे, त्या बरोबरच वाढीव दराने देण्यात आलेली वीज बिले रद्द करण्यात यावीत, अशी मागणी महायुतीतर्फे करण्यात आली आहे.

फुलंब्री- येथे गाईचे पुजन करून भारतीय जनता पार्टी च्या वतीने आंदोलन करणयात आले .गायीच्या दुधाला सरसकट १० रु. लिटर अनुदान मिळावे व दुध पावडरला प्रती किलो ५० रु.अनुदान मका मका खरेदी करने व युरिया खत मिळण्यासाठी महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.या वेळी विजय औताडे,सौ अनुराधाताई चव्हाण, सुहासजी शिरसाठ,सौ सविताताई फुके,शिवाजीराव पाथ्रीकर ,जितेंद्रजी जैस्वाल, सर्व पं स सदस्य नगरसेवक सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी- माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर- मनमाड रस्त्यावर आंदोलन करण्यात आले

औरंगाबाद शहरात करण्यात आलेल्या  आंदोलनात मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.                                           दुध उत्पादक  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी  आज भाजपा महायुतीचे शहरात राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन करण्यात आले.यात प्रामुख्याने दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे व गायीच्या दुधाला प्रतीलिटर ३० रुपये भाव द्यावा व दुधाच्या पावडरला निर्यातीसाठी प्रती किलो ५० रुपये अनुदान द्यावे या व अशा मागण्यांचे पत्रक  व घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार अतुल मोरेश्वर सावे , शहराध्यक्ष संजय केनेकर, मनोज पांगरकर, बसवराज मंगरुळे,माधुरीताई अदवंत, सविताताई कुलकर्णी ,एजाज देशमुख, कचरु घोडके, समिर राजुरकर,शिवाजी दांडगे, प्रा.गोविंद केंद्रे,प्रा.राम बुधवंत, राज वानखेडे, नितीन चित्ते, बालाजी मुंडे, सागर नीलकंठ, रामेश्वर भादवे, मंगलमुर्ती शास्त्री , लक्ष्मीकांत थेटे, अरुण पालवे, किशोर थोरात, अशोक दामले, अरविंद डोणगावकर, जालिंदर शेंडगे,  विवेक राठोड, उमाकांत रत्नपारखी, जयराज पाटील,  राजेंद्र साबळे,  चंद्रकांत हिवराळे, राजु वाडेकर,डाँ.गंडे पाटिल, रामचंद्र जाधव, शैलेश पाटणी,अर्जुन गवारे, संजय जाईबहार, राहुल चाबुकस्वार, श्रीनिवास देव, राजेश मेहता,  दिव्याताई मराठे, विजयसिंग झाला, आकाश बसैये, दिपक बनकर,ताराचंद गायकवाड, बिट्टु गाडेकर, सुदाममामा सांळुखे,सागर पाले यांच्यासोबत नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *