पंचगंगा उद्योग समूहातर्फे नवीन साखर कारखान्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी होणार

वैजापूर तालुक्यातील प्रलंबित कामासंदर्भात आ.बोरणारे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

वैजापूर,२८ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामासंदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले.  वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरू करणे व इतर काही प्रलंबित प्रश्नासंदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे व पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तालुक्यातील बाजाठाण फाटा येथे पंचगंगा उद्योग समूहातर्फे नवीन साखर कारखाना उभारण्यात येत असून या कारखान्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवारी होणार आहे.