इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे जुलै 2022 सत्राचे प्रवेश विवेकानंद महाविद्यालयात सुरु

औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली , (UGCNAACA++ प्राप्त मुक्त विद्यापीठ ) प्रादेशिककेंद्र पुणे अंतर्गत औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयातील इग्नू (IGNOU) अभ्यासकेंद्र 1610 मध्ये  जुलै 2022 सञाचे वेगवेगळ्या इग्नूच्या अभ्यासक्रमांना 31 July  2022 पर्यंत (www.ignou.ac.in) प्रवेश देण्यात येत आहेत / चालू आहेत, प्रवेशासाठी लिंक-ignouadmission.samarth.edu.in.

 तसेच जुलै २०२२ सत्रापासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठाकडून नव्याने करण्यात आलेल्या तरतुदीनुसार  इग्नूमध्ये एकाच
वेळेस दोन वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेता येईल. इग्नू प्रवेशांमध्ये पदवी स्तरावर वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये बीबीए, बीए,  बी कॉम , बी एस डब्ल्यू,   मास्टर्स डिग्री प्रोग्राम्स मध्ये पदव्युत्तर  स्तरावर  एम. ए. इंग्लिश, हिंदी, एमएस डब्ल्यू,मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, हिंदी, राज्यशास्त्र, लोकप्रशासन,समाजशास्त्र, कॉमर्स, रूरल डेव्हलपमेंट  तसेच  पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स मध्ये ट्रान्सलेशन, गांधी आणि पीस  स्टडीज,  रूरल डेव्हलपमेंट,  जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, उच्चशिक्षण,  डिझास्टर मॅनेजमेंट, बुक पब्लिशिंग,  टुरिझम , क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश  अशा वेगवेगळ्या कोर्सेसना  31 जुलै 2022 पर्यंत प्रवेश चालू आहेत. तसेच SC / ST विद्यार्थ्यांना Degree level, Certificate and Post Graduate Diploma Programmes ला मोफत प्रवेश देण्यात येत आहेत.
              ह्या वर्षीपासून (July 2022 session)  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ही ह्यांनी नव्याने MA in CORPORATE SOCIAL
RESPONSIBILITY,  MA in URBAN STUDIES,   MA in ENVIRONMENT and OCCUPATIONAL HEALTH,  MSC in FOOD SAFETY AND QUALITY MANAGEMENT,  PG DIPLOMA in MIGRATION AND DIASPORA,  PG DIPLOMA in AGRIBUSINESS,
DIPLOMA in HORTICULTURE and MASTER OF SCIENCE (INFORMATION SECURITY).
              इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली प्रादेशिक केंद्र पुणे अंतर्गत चालणाऱ्या जुलै २०२२ सत्रासाठी  वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिक माहिती साठी विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद येथील इग्नू स्टडी सेंटर 1610 विवेकानंद महाविद्यालयात
कार्यालयीन वेळेमध्ये (मंगळवार ते शनिवार 4 ते 7 , रविवार 10.30 ते 1.30, Phone No. 0240-2348153) संपर्क साधण्याचे आव्हान महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे यांनी केले आहे