काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस ; वैजापूर येथे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे सत्याग्रह

वैजापूर,२७ जुलै /प्रतिनिधी :- काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना ईडीने दिलेल्या नोटीस व मोदी सरकारच्या चाललेल्या सूडबुद्धीचे राजकारण व सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून दडपशाहीचे राजकारण विरोधात वैजापूर तालुका काँग्रेसतर्फे मंगळवारी वैजापूर तहसील कार्यालय परिसरात शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सत्याग्रहात शहराध्यक्ष काझी मलिक, जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, रोहित आहेर, माजी नगरसेवक सय्यद हिकमत, अल्ताफ बाबा, विनायक गाढे, साहेबराव पडवळ, विकिराज सोमवंशी, बाबासाहेब गायकवाड, मधुकर साळुंके, सुलतान कुरेशी, रवि संचेती, बाबासाहेब पगारे, दिगंबर वाघचौरे, शिवनाथ मापारी, राजू मगर, प्रवीण जाधव, भगवान भोकरे, सुनील कुंदे, राजेंद्र बागुल, सागर थोट, निसार मिस्तरी, संजय बागुल, सुदामसिंग छानवाल यांच्यासह युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय. अनुसूचित जाती जमाती विभाग, काँग्रेस सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, ओबीसी सेल, सोशल मीडिया काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.