जालन्यात 82 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 1 :-जालना जिल्ह्यात आज शनिवारी राती 82 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक 11 अंबड मध्ये तर 10 रुग्ण भोकरदन शहरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2308 इतकी झाली असून आजपर्यंत 1506 रुग्णांचा सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, आज पर्यंत एकूण 72 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. आज शनिवारी रात्री पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये अंबड शहरातील 8 रुग्ण असून अंबड तालुक्यातील साडेसावनगी येथील 2,सुरगी नगर ता.अंबड 1,भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील 5,खंडोबा मंदीर 4 आणि प्रसाद गल्ली या भागातील 1 असे दहा रुग्ण भोकरदन शहरात आढळून आले आहेत. परतूर शहरातील बालाजी गल्ली भागात 4, मोंढा परतूर 2,जिजाऊ नगर परतूर 1, नवीन मोंढा भागात 1, शनिवार पेठ देऊळगाव राजा 1, देऊळगाव राजा सिव्हिल कॉलनी 1,पाचन वडगाव 1, म्हसला ता.परतूर 1, कोठी 2, गणेशनगर बदनापूर 1,बोडखा ता.घनसावंगी 1, सुरगीनगर ता.अंबड 1, गावधी मोहल्ला बदनापूर 1, तसेच जालना शहरातील समर्थनगर 3,प्रीतीसुधा नगर 2, डबलजीन 2, संभाजीनगर, जागडेनगर, दुर्गामाता रोड, आरपी रोड, भाग्यनगर, सोनलनगर,इसार गार्डन,रामनगर, धोका मिल,हमालपुरा आणि रामनगर पोलीस कॉलनी या भागातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *