लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन पीडितेवर बलात्‍कार:आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

औरंगाबाद,२४ जुलै /प्रतिनिधी :- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन पीडितेला गावातून मित्रासोबत पळण्‍यास भाग पाडल्यानंतर तिच्‍याशी लग्न करण्‍यास नकार दिला. तर आरोपीच्‍या मित्राने याचा फायदा घेत पीडितेला तुला बायको करुन घेते असे म्हणत तिच्‍यावर वारंवार बळजबरी बलात्‍कार केला. हा प्रकार १४ जून ते २२ जुलै दरम्यान घडला.या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन पीडितेवर बलात्‍कार करणारा अजिनाथ अर्जुन गायकवाड (२३, रा. तळेगाव ता. भोकरदन जि. जालना) याच्‍या मुसक्या आवळल्या. आरोपीला सोमवारपर्यंत दि.२५ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी दिले.

या प्रकरणात १६ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १४ जून रोजी पीडिता ही शाळेत जाते म्हणुन घरातून निघाली, ती परत घरी आलीच नाही. प्रकरणात वडोदबाजार पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी आरोपी अजिनाथ गायकवाड आणि पीडितेला २२ जुलै रोजी माळी पिंपळगाव (जि. जालना) येथून ताब्यात घेतले. पीडितेचा जबाब घेण्‍यात आला असता, तीन वर्षांपासून आरोपी अजिनाथ कोलते (रा. ता. फुलंब्री)  याच्‍याशी पीडितेचे प्रेम संबंध होते. कोलते याने पीडितेला पळून जावून लग्न करु असे सांगितले होते. त्‍यानूसार १४ जून रोजी सकाळी पीडिता घरातून निघाली. आरोपीने पीडितेला मीत्र तथा आरोपी अजिनाथ गायकवाड याच्‍यासोबत येण्‍यास सांगितले.

गायकवाड याने पीडितेला दुचाकीवर औरंगाबाद रेल्वे स्‍टेशनला आणले. तेथून ते दोघे पुणे आणि त्यानंतर शिर्डी येथे गले. तेथे पीडितेचा प्रियकर तथा आरोपी आजिनाथ कोलते आला, त्‍याने आता तु मला लागत नाही, तुला काय करायचे ते करुन घे असे म्हणत तो तेथून निघुन गेला. याचा फायदा घेत आरोपी अजिनाथ गायकवाड याने तुझी बदनामी झालीच आहे, आता मीच तुला बायको करुन घेतो म्हणत पीडितेला माळी पिंपळगाव (जि. जालना) येथे आणले. तेथे एक रुम करुन तो पीडितेसोबत राहता होता. त्‍याने पीडितेवर दबाव टाकून जबरदस्‍तीने वारंवार पीडितेवर बलात्‍कार केला.

आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीला आणखी कोणी मदत केली काय, आरोपीची वैद्यकिय तपासणी करायची आहे. आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी जप्‍त करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.