आपत्ती व्यवस्थापन साहित्य प्रदर्शनाचा नागरिकांनी घेतला लाभ
औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध अत्याधुनिक साहित्याचे एक दिवसीय प्रदर्शन पार पडले. नागरिकांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घेतल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची उपलब्धता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी करुन दिल्याबद्दल कक्षाच्यावतीने त्यांचे आभारही यावेळी मानण्यात आले.