तलवार घेवून फिरणाऱ्या एकाला अटक

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :-तलवार घेवून फिरणाऱ्या एकाला हर्सुल पोलिसांनी अटक केली. वैभव अशोक शेजुळ (२२, रा. चेतनानगर, हर्सुल) असे आरोपीचे नाव असून त्‍याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी शुक्रवारी दिले.

या प्रकरणात हवालदार शिवाजी आण्‍णा मनगटे (५७) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, २२ जुलै रोजी सकाळी फिर्यादी हे सहाकाऱ्यासह हद्दीत गस्‍त घालत होते. त्‍यावेळी आरोपी वैभव शेजुळ हा चेतनानगर परिसरातील महापालिकेच्‍या दवाखान्‍याजवळ तलवार घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून वैभव शेजुळ याला अटक केली. तसेच त्याच्‍या ताब्यातून एक तलावार देखील हस्‍तगत करण्‍यात आली आहे.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीने तलवार कोठून व कोणाकडून आणली, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.