औरंगाबाद जिल्ह्यात 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, दि.31 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 231 जणांना (मनपा 130, ग्रामीण 101) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10192 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14123 झाली आहे. आजपर्यंत एकूण 475 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3456 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुपारनंतर 233 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 35, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 70 आणि ग्रामीण भागात 100 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बाजारसावंगीत 71 वर्षीय पुरूष, पैठणमधील 95 वर्षीय स्त्री आणि वैजापुरातील 67 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद, खराडी येथील 65 वर्षीय स्त्री आणि शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यातील 66 वर्षीय, वैजापुरातील 81 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहर परिसरातील बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये एन-सात सिडको १, एन-सहा सिडको १, शिवशंकर कॉलनी १, मिलिट्री हॉस्पिटल १, सनी सेंटर, पिसादेवी रोड १, नवनाथ नगर, हडको १, जालान नगर १, चिकलठाणा १, नंदनवन कॉलनी १, बीड बायपास रोड १, हनुमान मंदिराजवळ १, मुलांचे वसतिगृह १, टीव्ही सेंटर १, देवळाई परिसर १, शिवाजी नगर १, एन-नऊ सिडको १, गुलमोहर कॉलनी, पडेगाव २, एसआरपीएफ सातारा परिसर १, एन-पाच, सिडको १, हिलाल कॉलनी १, राजीव गांधी नगर १, शिवशंकर कॉलनी ७, मुकुंदवाडी १, इंदिरा नगर, गारखेडा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, रेल्वे स्टेशन परिसर १, टाऊन हॉल, जयभीम नगर २, राम नगर १, मिसारवाडी १, मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर १, दिल्ली गेट १, खोकडपुरा १, संत तुकाराम वसततिगृहाजवळ १, शिवाजीनगर २, कोटला कॉलनी १, बन्सीलाल नगर ३, पद्मपुरा १, पडेगाव २ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.     

ग्रामीण भागातील बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये रांजणगाव शेणपूजी १, कन्नड १, भराडी, सिल्लोड १, वैजापूर १, जरंडी, सोयगाव २, पळशी १, पैठण १, अंबा, कन्नड १, औरंगाबाद १८, फुलंब्री ८, गंगापूर १२, खुलताबाद ८, सिल्लोड ६, वैजापूर १०, पैठण १६, सोयगाव २२, भगवान गल्ली, बिडकीन १, अक्षय तृतीया अपार्टमेंट, बजाज नगर १, सिडको महानगर एक, वाळूज १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, बिडकीन, पैठण १, पाचोड, पैठण १, पानवाडी, जातेगाव १, बाजार गल्ली, फुलंब्री ५, देऊळगाव बाजार, फुलंब्री १, महाल किन्होळा, फुलंब्री ३ येथील व्यक्तींचा समावेश आहे.  

सिटी एंट्री पॉइंटवर ३५ बाधित

जिल्ह्यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७० व ग्रामीण भागात १०० बाधित आढळून आले. सिटी एंट्री पॉईंटवर आढळून आलेल्या बाधितांमध्ये न्यू म्हाडा कॉलनी येथील १, बजाज नगर २, जयभवानी नगर १, सावित्री फुले नगर १, वडगाव २, पडेगाव १, सावंगी १, आडगाव २, बालाजी नगर १, हर्सूल १, चितेगाव २, जाधववाडी १, चेतना नगर १, एन-११, यादव नगर १, एन-१२, स्वामी विवेकानंद नगर ४, सोयगाव २, खुलताबाद १, आसेगाव १, लिंबे जळगाव १, वाळूज २, गारखेडा १, पैठण २, चिकलठाणा १, बीड बायपास १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *