मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून दिल्लीमध्ये अटक करण्यात आली आहे.

संजय पांडे यांच्यावर एनएसई कर्मचाऱ्यांचे कॉल बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पांडे हे ३० जून रोजी निवृत्त झाले आहेत. २००९ ते २०१७ दरम्यान एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना ४.४५ कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे.

पांडे हे ३० जून रोजी निवृत्त झाले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांचा कार्यकाळ करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी डीजीपी म्हणूनही पदभार स्वीकारला होता. एनएसई कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगप्रकरणी सीबीआय आणि ईडी या दोघांनी संजय पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.