संभाजीनगरचा प्रस्ताव स्थगित केल्याच्या निषेधार्थ शिंदे- फडणवीस सरकारविरोधात वैजापुरात शिवसेनेची निदर्शने

वैजापूर,१६ जुलै /प्रतिनिधी :- ठाकरे सरकारने घेतलेला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव शिंदे सरकारने स्थगित केल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी वैजापूर येथे शिवसेनेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात शिवसेना- युवासेना तालुकाशाखेच्यावतीने करण्यात आलेल्या या निदर्शने आंदोलनात शिवसेनेचे जेष्ठ नेते आसाराम पाटील रोठे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे,किसान सेना जिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख तथा नगरसेवक सचिन(बंडू)वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शहरप्रमुख तथा पालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश पाटील चव्हाण, महिला आघाडी तालुका संघटक वर्षाताई जाधव, माजी तालुकाप्रमुख प्रकाश शिंदे, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पाटील गलांडे, उपतालुकप्रमुख मोहन साळुंके, ऍड रमेश पाटील सावंत, सिताराम पाटील भराडे, विभागप्रमुख नंदकिशोर जाधव, भगवान शिंदे,गणेश पाटील आहेर, हरी आदमाने, सुरेश आल्हाट, विकास जाधव, प्रवीण सोनवणे, राजू पाटील गलांडे, योगेश पाटील मोहिते, प्रसाद पवार, राजू जाधव, अंबादास डांगे, गणेश पाटील तांबे, बाबासाहेब पाटील गव्हाणे, कैलास धोत्रे, काकासाहेब गव्हाणे, अशोक राऊत, सुभाष राऊत, साहेबराव धोत्रे, गोरख गावडे, मोहन वाणी, चेतन मापारी, कैलास वाणी,अरविंद साळुंके, विठ्ठल निकम, संदीप वाणी, रवींद्र पगारे, युवासेनेचे विठ्ठल डमाळे,अनिल न्हावले,अक्षय साठे, संकेत पाटील वाणी,विजय(बाबा)त्रिभुवन, ज्ञानेश्वर मोटे, पवन बिडवे, कपिल पगारे,मनोज गावडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
श्रेय घेण्यासाठीच स्थगिती – सचिन वाणी 
श्रेय घेण्यासाठीच नामांतराला स्थगिती देण्यात आली होती. नामांतराच्या निर्णयाला स्थगिती  दिल्यामुळे चौफेर टीका होऊ लागताच मुख्यमंत्री शिंदे यांनी माघार घेतली व पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नामांतरावर शिक्कामोर्तब केले असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी यांनी यावेळी बोलतांना सांगितले.