पालखेड धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी नारंगी धरणात सोडा- आ. बोरणारे यांची मागणी

वैजापूर,१५ जुलै /प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्य़ातील बहुतांश धरणे ही ओव्हरफ्लो झाल्यामुळे सदरील धरणाचे पाणी हे गोदावरी नदीला सोडण्यात येत आहे तर पालखेड धरणही ओव्हरफ्लो झाल्याने सदरील ओव्हरफ्लो चे पाणी  डाव्या कालव्यातून नारंगी सारंगीत सोडण्याची मागणी आ.रमेश बोरनारे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.

पालखेडच्या डाव्या कालव्याचे ओव्हरफ्लोचे पाणी नारंगी-सारंगी धरणात सोडण्याची जिल्हाधिकाऱ्याना मागणी जोर धरू लागली आखाड महिन्यातील पावसाच्या जोरदार हजेरीमुळे गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली,तसेच नाशिक धरण क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पाउस झाल्याने गोदावरी नदीमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे.ज्यामुळे पालखेडच्या डाव्या कालव्याचे अतिरिक्त पाणी वैजापूर येथील नारंगी सारंगी धरणात सोडल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल व याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्याना व नागरिकांना होईल,ज्यामुळे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी जिल्हाधिकाऱ्याना पत्र लिहून पालखेडच्या डाव्या कालव्याचे ओव्हारफ्लो चे पाणी सोडण्याकरिता मागणी केली आहे.