औरंगाबादेत २७६ नवे कोरोनाबाधित,सहा मृत्यू

औरंगाबाद, दि.30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 281 जणांना (मनपा 132, ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9961 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 276 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13842 झाली आहे. आजपर्यंत एकूण 469 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3412 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये नागेश्वरवाडी येथील १, एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर ३, एन-दोन सिडको २, मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर १, मार्ड हॉस्टेल १, खोकडपुरा १, मिटमिटा १, प्रबुद्ध नगर, पानचक्की परिसर ३, एन-सात सिडको ५, शांतीनाथ सोसायटी, गादिया विहार १, साजापूर १, रोजा बाग १, आनंद नगर, कोटला कॉलनी १, फरहाद नगर, जटवाडा रोड १, बन्सीलाल नगर २, बाजीप्रभू चौक, गजानन नगर १, सुराणा नगर १, जवाहर कॉलनी २, वेदांत नगर ४, एन-दोन सिडको १, मयूर नगर, हडको १, एन-नऊ हडको १, आंबेडकर नगर १, झांबड इस्टेट परिसर १, तर सुराणा नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.    

ग्रामीण भाग

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील ६, फुलंब्री ३, गंगापूर २२, खुलताबाद ८, सिल्लोड ३, वैजापूर ७, पैठण ४, सोयगाव १२, अंभई सिल्लोड १, स्नेहवाटिका, सिडको महानगर १, वाळूज १, बजाज नगर, वाळूज १, फुले नगर, वडगाव १, आडगाव माडरवाडी, कन्नड २, टाकळी, खुलताबाद १, औरंगाबाद ४, फुलंब्री २, गंगापूर १९, सिल्लोड ९, वैजापूर १२, पैठण ९, सोयगाव ८, टाकळी पांगरा, पैठण १, तर वंजाळा, सिल्लोड येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवर ३८ बाधित

सिटी एंट्री पॉईंटवर आढळून आलेल्या बाधितांमध्ये सिडको महानगर ३, भावसिंगपुरा १, हर्सूल १, शिवाजी नगर १, शेंद्रा एमआयडीसी परिसर १, बालाजी नगर ३, आडगाव खुर्द १, राजीव गांधी नगर १, संजय नगर १, राम नगर १, कुंभेफळ १, आडगाव १, हर्सूल १, मयूर पार्क ३, म्हसोबा नगर २, सातारा परिसर १, पेठे नगर १, गंगापूर, आंबेगाव १, रांजणगाव १, सावित्री नगर, चिकलठाणा १, पडेगाव २, नारेगाव १, वेरूळ १, वैजापूर १, कन्नड १, बजाज नगर १, सिडको १,  लिंबे जळगाव १, राहुल नगर, रेल्वे स्टेशन परिसर १, चित्तेगाव १, मनपा ३, पहाडसिंगपुरा १, एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर १, तर रोहिला गल्ली, सिटी चौक येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यातील पाच, तर बीड जिल्ह्यातील एक, अशा सहा करोनाबाधितांचा उपचारादरम्यान घाटी तसेच खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ४६९ झाली आहे.शहरातील विश्रांतीनगर येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला २१ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी (२९ जुलै) मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला. अविष्कार कॉलनी, एन-सहा, सिडको परिसरातील ७९ वर्षीय पुरुष रुग्णाला २७ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा बुधवारी रात्री साडेअकरा वाजता मृत्यू झाला. खोकडपुरा येथील ७६ वर्षीय महिला रुग्णाला बुधवारी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालावरुन रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. त्यापूर्वीच उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मोमिनपुरा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. उपचारादरम्यान रुग्णाचा गुरुवारी सकाळी दहा वाजता मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील रौफ कॉलनीतील ७४ वर्षीय महिला रुग्णाला ११ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुगण बाधित असल्याचे चाचणी अहवालावरुन स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता मृत्यू झाला. तर, सिल्लोड तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३५५ बाधितांचा, तर जिल्ह्यात ४६९ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *