जलशक्ती अभियानाच्या विविध कामांची समितीने केली पाहणी

औरंगाबाद,१३ जुलै /प्रतिनिधी :- जलशक्ती अभियान : कॅच द रेन 2022 या कालबद्ध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या ‍विविध कामांची केंद्र शासनाचे या अभियानाचे नोडल अधिकारी मोहम्मद रिजवान,‍ एम. एस. हनुमंथाप्पा या समितीने यांनी पाहणी केली. या कामांबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.

May be an image of 5 people and outdoors

सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील  विहिर पुनर्भरण, शहराजवळील खाम नदी पुर्नज्जीवन,  जलसंधारण कार्यालयातील जलशक्ती अभियान कक्ष आदी कामांची ‍समितीने पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील  विहिरीच्या पुनर्भरणाची सविस्तर माहिती समितीला दिली.

May be an image of 3 people, people standing, tree and outdoors

 पडेगाव येथील शेळी मेंढीपालन प्रशिक्षण कार्यालय परिसरातील 32 एकरावरील विविध दुर्मिळ प्रजातींच्या, सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस बल कॅम्प परिसरात विपुलप्रमाणात करण्यात आलेल्या विविध देशी रोपांची लागवड, परिसरातील तलाव आणि मराठवाडा इको बटालियनकडून गोगाबाबा टेकडीवर, जवळील वृक्ष लागवडीची पाहणीही समितीने केली. कामाच्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देत सविस्तर माहितीही समितीने जाणून घेतली.

May be an image of 7 people, people standing and outdoors

पडेगाव येथे जनसहयोग संस्थेचे प्रशांत गिरे यांनी विविध रोपांची माहिती श्री. रिजवान, हनुमंथाप्पा यांना दिली. यामध्ये 350 वडांचे रोपन, विविध वनौषधींची लागवड, दुर्मिळ होत असलेल्या वृक्षरोपांची 32 एकर परिसरात होत असलेली लागवड आदींबाबत माहिती दिली. श्री.रिजवान यांनी  जनसहयोग संस्थेच्या कामाचे कौतुक केले.

राज्य राखीव पोलिस बल यांच्या सातारा परिसरात लावलेल्या ठिकाणी समितीने भेट दिली. येथे वृक्ष रोपांची माहिती पोलिस उपअधीक्षक बी.एन.पवार यांनी दिली. गोगाबाबा टेकडी येथे करण्यात येत असलेल्या वृक्ष लागवडीची सविस्तर माहिती मराठवाडा इको बटालियनचे मेजर मिथील जयकर यांनी दिली.

May be an image of 8 people, people standing, tree and grass

पाहणी दरम्यान उपवनसंरक्षक अरूण पाटील, सहायक वनसंरक्षक सचिन शिंदे, श्री. पाखरे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी किर्ती जमधडे-कोकाटे, वन परिक्षेत्र अधिकारी अनिल पाटील, जलशक्ती अभियानाचे  सदस्य सचिव तथा जिल्हा संधारण अधिकारी एस.एन. शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एम.बूब उपस्थित होते.